रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियन सैन्याला मोठे यश मिळाले आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये अमेरिकन डिझाइनचे एफ-16 लढाऊ विमान पाडल्याचे वृत्त आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वीच यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र, रशियाने ठिकानाचा खुलासा केलेला नाही. रशियाने एफ-16 पाडल्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रशियन मंत्रालयाने आपल्या ब्रिफिंगमध्ये, "युक्रेनियन हवाई दलाचे एक एफ-१६ विमान हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले", असे म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी, शनिवारी (12 एप्रिल, 2025) युक्रेनच्या हवाईदलाने अपले एक F-16 लढाऊ विमान हरवल्याचे म्हटले होते. यानंतर, विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी एक आंतर-विभागीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.
रशियानं एफ-16 पाडण्यासाठी कोणतं मिसाईल वापरलं? -बीबीसी युक्रेनने एका युक्रेनी सूत्राच्या हवाल्याने, रशियन सैन्याने एफ-16 पाडल्याचा दावा केला आहे. यानुसार, "रशियाने विमानावर तीन मिसाइल डागले. हे एकतर एस-400 ग्राउंड-बेस्ड सिस्टिमने निर्देशित अँटी-एअरक्राफ्ट मिसाइल होते अथवा आर-37 एअर-टू-एअर मिसाइल होते." महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान म्हणजे, अमेरिकेची शान समजले जाते.
एफ-16 पडल्यानं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार -रशियाच्या या दाव्यानंतर पाकिस्तानचे टेन्शन वाढणार आहे. रशियन मिसाईल अथवा एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याची बातमी पाकिस्तानचे टेन्शन वाढवणारी असू शकते. कारण पाकिस्तान एफ-१६ विमानांवर अवलंबून आहे. पाकिस्तानकडे सुमारे ८५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत. तर, भारताने रशियाकडून 5 एस-400 डिफेन्स सिस्टिम खरेदी केल्या असून त्या पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेऊन चंदिगड आणि गुजरातमध्ये करण्यात आली आहे. यामुळे हे वृत्त पाकिस्तानचे टेन्शन वाढवणारे आहे.