पेइचिंग : लडाखमधील भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. एकिकडे अमेरिकेने चीनला डिप्लोमसीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे चीन अर्ध्यारात्री अंधारात युद्ध सराव करत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडने सोमवारी रात्री उशिरा 4,700 मीटर उंचीवर आपले सैनिक पाठवून कठीन परिस्थित ताकदीचा आणि क्षमतेचा अंदाज घेतला.
पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा
पुढची तयारी करतोय चीन -चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे. यात म्हणण्यात आले आहे, की भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात काही घटनादेखील झाल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. यावरून अंदाज लावण्यात येत आहे, की चीन या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढची तयारी करत आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनची भूमिका आक्रमक असल्याने अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
अंधारात शक्तीप्रदर्शन -चीन सेन्ट्रल टेलिव्हीजनने (CCTV) दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 1 वाजता पीएलएच्या स्काउट युनिटने तांगुला पहाडांच्या दिशेने येण्यास सुरूवात केली आहे. मार्च महिन्यादरम्यान ड्रोनपासून बचाव व्हावा यासाठी, गाडीचे लाईट्स बंद ठेवण्यात आले आणि नाईट व्हिजन डिव्हाईसची मदत घेण्यात आली. एवढेच नाही, तर मार्गात येणारे अडथळे पार करून ड्रोनच्या सहाय्याने स्फोट केले गेले. लक्ष्याच्या जवळ जाऊन कॉम्बॅट टेस्टदेखील करण्यात आली. यासाठी, स्नायपर युनिटला समोर पाठवण्यात आले. यासोबतच फायर स्ट्राइक टीमने एकगाडीही अँटी टँक रॉकेटने उडवली. यावेळी नव्या उपकरणांसह लढण्यास सैन्य कितपत तयार आहे, याचाही अंदाज घेण्यात आला.
'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
रात्रीच्या हल्ल्याने वाढूशकते अडचण -साउथवेस्ट चीनचे तिब्बत ऑटोनॉमस रिजनच्या उंचावरील भागात तैनात राहिलेल्या रिटायर्ड पीएलए अधिकाऱ्याने ग्लोबल टाइम्सला सांगितले, की या भागात रात्रीच्यावेळी अत्यंत ठंडी असते. तसेच उंचावर ऑक्सिजनदेखील कमी होतो. यामुळे सैन्याला त्रास होऊ शकतो. एवढेच नाही, तर हार्डवेअर्सच्या वापरातही अडचणी येऊ शकतात. ते म्हणाले, रात्री हल्ला करून केवळ एक लढाईच जिंकली जाऊ शकते आणि यात अचानक हल्ला केल्यास मदत मिळू शकते.
कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक