रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात अद्यापही युद्ध सुरूच आहे. असे असतानाच आता रशियाने मध्य-पूर्व आशियातील सीरियावरही (Syria) जबरदस्त हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात 120 बंडखोर मारले गेल्याचे वृत्त आहे. वायव्य सीरियातील (North-Western Syria) अल-कायदाशी संबंधित (Al-Queda) नुसरा फ्रंटच्या (Al-Nusra Front) ठिकाणांवर रशियाच्या लढाऊ विमानांनी जबरदस्त बॉम्बिंग केली. या हवाई हल्ल्यांमुळे (Russian Air Strike) परिसरात एकच धावपळ उडाली. नुसरा फ्रंटची अनेक ठिकानं नष्ट झाली आहे.
सना या वृत्तसंस्थेने सीरियातील रशियातील सैन्य सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन लढाऊ विमानांनी इदलिब प्रांतातील शेख यूसुफ भागात एक नुसरा फ्रंट ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्यात ऑब्झर्व्हेशन पॉइंट्स, ड्रोन आणि मिसाइल लान्चर्स नष्ट करण्यात आले आहेत.
रशियानंकेले 14 हवाई हमल्ले - ब्रिटेनमधील युद्ध मॉनिटर सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सनेही इदलिबमधील रशियन हल्ल्याचे वृत्त दिले आहे. यात, रशियन फायटर जेटने गुरुवारी 14 हवाई हल्ले केल्याचे आणि इदलिब प्रांतातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागावर क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे म्हणण्यात आले आहे.
इदलिब बनलाय बंडखोरांचा गड -विशेष म्हणजे, इदलिबवर नुसरा फ्रंट सारख्या कट्टरपंथी गटांसह अनेक बंडखोर गटांनी कब्जा केला आहे. इदलिब हा सीरियातील बंडखोरांचा शेवटचा मोठा गड म्हणून उदयास आला आहे. रशियाने कट्टरपंथीयांचा हा कब्जा हटविण्यासाठी हा हल्ला केला आहे.