ऑनलाइन लोकमत
अाक्रा (घाना), दि. 28 - गुबगुबीत गाल असलेल्या निरागस चिमुकल्याची गंभीर मुद्राच शिक्षणाचे एक प्रतीक झाले असून, गत 24 तासांत तब्बल 1642 डॉलरचा निधा उभा केला आहे. या मुलाच्या छायाचित्राच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिकांचा शिक्षणाकडे कल वाढला आहे. ग्रामस्थांनी जेक या अध्ययन मग्न गोंडस मुलाचे छायाचित्र मोबाइलवर व्हायरल झाले आहे. जेक हा उत्तर घानातील एका राहत असून, त्याला त्यांच्या प्रसिद्धीचा मागमूस देखील नाही. ज्या छायाचित्रकाराने त्या मुलाचे चित्र टिपले, त्याला बुधवारपर्यंत या प्रसिद्धीची माहीती देखील नव्हती. कारलोस कॉरटस या छायाचित्रकार घानामध्ये एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी आला होता. शाळेतील चित्रीकरणादरम्यान धीरगंभीर चेहराचा हा चिमुकला अध्ययन करताना कॅमेरात टिपला गेला. त्यानंतर कारलोसने त्याची छायाचित्र इस्टाग्रामवर पोस्ट करताच ते व्हायरल झाले. या छायाचित्रांचा शिक्षणसाठी निधी गोळा करण्याचा उद्देश ठेवून ते प्रसारित केले आणि अवघ्या 24 तासात 1642 डॉलरचा मोठा निधी उभारला गेला.