लंडन : आपल्या पूर्वजांना आपल्यापेक्षा कमी झोप मिळत असावी, असे संशोधनात आढळले आहे. अमेरिकन संशोधकांनी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही समुदायातील लोकांच्या झोपेच्या पद्धतींचा अभ्यास केला. या लोकांची जीवनशैली आपल्या पूर्वजांशी मिळतीजुळती असल्याने संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. संशोधकांनी ९८ लोकांचे १,१६५ रात्री निरीक्षण केले. तेव्हा हे लोक रोज रात्री सरासरी ६.५ तास झोपत असल्याचे आढळले. अमेरिकेतील बहुतांश लोकांना सात तास झोप मिळते.‘करंट बॉयोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासानुसार, झोपेच्या पद्धतीवर प्रकाशापेक्षा तापमानाचा अधिक प्रभाव असतो. नैसर्गिक प्रकाशाचा झोपेवर मोठा प्रभाव असतो, असे मानले जात होते. मात्र, या अभ्यासात नैसर्गिक प्रकाश नाहीतर तापमानाची कळीची भूमिका असल्याचे आढळले. (वृत्तसंस्था)
‘पूर्वजांना आपल्यापेक्षा कमी झोप मिळत असावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2015 11:37 PM