शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

फ्रान्समध्ये सापडलं हरवलेलं राजधानीचं शहर, ख्रिस्तपूर्व काळातील दुर्मीळ खजिन्याचाही लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 8:48 PM

Ancient Capital City In France: फ्रान्सच्या ल्योन शहरापासून १२८ किमी दूर अंतरावर पुरातत्ववेत्यांना एक प्राचीन शहर सापडले आहे. या ठिकाणावरून शोधकर्त्यांना शेकडो विविध प्रकारच्या वस्तूही सापडल्या आहेत.

पॅरिस - फ्रान्सच्या ल्योन शहरापासून १२८ किमी दूर अंतरावर पुरातत्ववेत्यांना एक प्राचीन शहर सापडले आहे. या ठिकाणावरून शोधकर्त्यांना शेकडो विविध प्रकारच्या वस्तूही सापडल्या आहेत. या वस्तू ख्रिस्त जन्मापूर्वी ८०० वर्षे आधीच्या आहेत. शोधलेल्या खजान्यामध्ये काशाची हत्यारे आणि ट्रिकेंट, तसेच कुंभाराने बनवलेल्या घागरी आणि रथाचे तुकडे सापडले आहेत. (The lost capital city found in France)

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राचीन वस्तू सापडल्याने टुलूस-जीन-जारेस विद्यापीठाचे पुरातत्ववेत्ते खूप खूश आहेत. हे शहर सेल्टिक कॅपिटल सिटीचा भाग असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येथील मिळालेल्या कलाकृती ह्या ख्रिस्तपूर्वीच्या सुमारे ८०० वर्षांपूर्वीच्या किंवा फ्रान्सच्या कांस्य युगाशी संबंधित अर्नफिल्ड संस्कृती (१३०० ते ८०० ख्रिस्तपूर्व)च्या अखेरच्या काळाताली असाव्यात असा अंदाज आहे. या उत्खननादरम्यान, पुरातत्ववेत्यांना असामान्य आकारामध्ये ३० हेक्टर क्षेत्रात पसरलेली वस्ती सापडली आहे. या वस्तीच्या संरक्षणासाठी २० फूट उंच दगडांची तटबंदीही उभारलेली आहे. तसेच आतमध्ये वस्तीच्या सुरक्षेसाठी व्यवसस्था आहे.  

टुलूज-जीन जौरेस विद्यापीठाचे एक लेक्चरर पियरे-यवेस मिल्सेंट यांच्या म्हणण्यानुसार फ्रान्समध्ये आधी सापडलेल्या अशा प्रकारच्या साईट्स केवळ चार हेक्टर परिसरामध्ये पसरलेल्या आहे. अशा परिस्थितीत हे ठिकाण कदाचित मोठ्या प्रदेशाची राजधानी असावी. दरम्यान, येथील काही कलाकृती ह्या अगदी सुव्यवस्थित अवस्थेत सापडल्या, असेही पुरातत्ववेत्यांनी सांगितले.

फ्रान्स टीव्ही इन्फोच्या एका रिपोर्टनुसार एक फुलदाणी महिला आणि मुलांचे दागिने, ट्रिंकेट आणि छल्ल्याने भरलेली होती. दुसऱ्या फुलदाणीमध्ये हत्यारे आणि अवजारे होती. ज्यामध्या चाकू आणि भाल्याच्या टोकांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते या वस्तू काही निश्चित हेतूने पुरल्या असाव्यात, अशी शक्यता आहे.

या कलाकृतींचा वापर एखाद्या अनुष्ठानामध्ये देवांना प्रसाद म्हणून समर्पित करण्यासाठी केला गेला असावा, या प्राचीन स्थळी मोठ्या संख्येत प्राचीन वस्तू सापडल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माम झालेले आहे.अशा परिस्थितीत पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

टॅग्स :historyइतिहासFranceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीय