भूतान : पंतप्रधान नरेंद्र माेदी दाेन दिवसांच्या भुतान दाेऱ्यावर हाेते. काही वेळापूर्वीच ते भारतात परतण्यासाठी विमानतळावर दाखल झाले आहेत. भुतानमध्ये माेदींचे जाेरदार स्वागत करण्यात आले. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान माेदींच्या समाेर आणखी एक माेदी आले. याबाबतचा व्हिडीओ पीएमाेने देखील ट्विट केला आहे.
दाेन दिवसांच्या भुतान दाेऱ्यावर गेलेल्या माेदींचे शेजारील राष्ट्राने जाेरदार स्वागत केले. भुतानचे पंतप्रधान लाेटे शेरिंग माेदींच्या स्वागताला विमानतळावर हजर हाेते. भुतानच्या शाही महालमध्ये माेदींना गार्ड ऑफ ऑनर देखील प्रदान करण्यात आला. भुतानच्या रस्त्यांच्या दुतर्भा नागरिक भारत आणि भूतानचा राष्ट्रध्वज घेऊन माेदींच्या स्वागताला उभे हाेते. एका स्वागत साेहळ्यात तर माेदींच्या समाेर आणखी एक माेदी आले.
माेदींच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात माेदींच्या प्रधानमंत्री पदापर्यंतच्या प्रवासावर सादरीकरण करण्यात आले. माेदींच्या समाेर भूतानच्या कलाकारांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. पीएमाेने सुद्धा याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. माेदी 17 ऑगस्टला भूतान दाैऱ्यावर गेले हाेते. या दाैऱ्यात दाेन्ही देशात एकूण 9 करार करण्यात आले. या दाेऱ्यात माेदींनी रुपेकार्डचे देखील उद्घाटन केले. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर माेदी यांनी पहिला विदेश दाैरा भूतानचा केला हाेता. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देखील पहिला विदेश दाैरा हा त्यांनी भूतानचाच केला.