सैबेरिया : मालवाहतूक करणाऱ्या विमानाचा दरवाजा उड्डाण करतेवेळी उघडला गेल्याने आतील सोने आणि अन्य मौल्यवान धातूच्या विटा धावपट्टीवर पडल्याचा प्रकार गुरुवारी रशियात घडला. या विमानात ९.३ टन वजनाच्या सोने, चांदी तसेच इतर मौल्यवान धातूंच्या विटा होत्या.सैबेरियाच्या याकुत्स्क या विमानतळावर इंधन भरल्यानंतर या विमानाने उड्डाणासाठी झेप घेताच त्याचा दरवाजा अचानक उघडला गेला आणि आतील मौल्यवान धातूच्या विटा विमानातून धडाधड धावपट्टीवर पडल्या. अत्यंत दुर्गम मानल्या जाणाºया चोकुत्का प्रदेशात कोपुल या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणीतून हे विमान मौल्यवान ऐवज घेऊन चालले होते. रशियन चौकशी समितीने सांगितले की, सामानाची हलवाहलव करताना विमानाच्या दरवाजाचे नुकसान झाले होते. विमान काही उंचीवर जाताच हा दरवाजा अचानक उघडला. समितीच्या एका सदस्याच्या मते विमानातील सामान नीटपणे लावले न गेल्याने उड्डाणानंतर हा प्रकार घडला असावा. हा प्रकार लक्षात येताच विमान पुन्हा उतरवण्यात आले आणि लोकांनी सोने-चांदी गोळा करण्यासाठी गर्दी करण्याआधी संपूर्ण परिसर सील करण्यात आला. सोन्याची एकही वीट झाली नाही गायबतास राज्याच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, धावपट्टीवर १७२ सोन्याच्या विटा सापडल्या. यांचे वजन ३.४ टन होते. हे विमान कुपोलच्या खाणींतून सोने घेऊन निघाले होते. ही खाण कॅनडातील किनरॉस गोल्ड ही कंपनी चालवते. कंपनीचे रशियातील प्रवक्ते स्टॅनिस्लाव बोरोड्युक यांनी सांगितले की, धावपट्टीवर पडलेल्या सोन्या-चांदीच्या सर्व विटा गोळा करण्यात आलेल्या आहेत. यातील एकही वीट गहाळ झालेली नाही.
एका वेबसाईटच्या माहितीनुसार, संपूर्ण खजिन्याची किंमत 265 मिलियन पौंड होती. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 240 कोटींपेक्षा जास्त आहे.
क्रासनोयार्स्क जाणाऱ्या या विमानाचं विमानतळापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. विमानातील क्रू मेंबर्स सुरक्षित आहे. मात्र विमानातून पडलेलं किती सोनं आणि अन्य मौल्यवान धातू परत मिळाले, याचा आकडा उपलब्ध झालेला नाही.