लंडन : ब्रिटनमध्ये गाजलेल्या फोन हॅकिंग प्रकरणातील दोषी आरोपी व पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचा माजी प्रवक्ता अँडी कौल्सन याला या प्रकरणात १८ महिन्यांची शिक्षा झाली आहे. फोन हॅकिंग प्रकरणात ब्रिटनचा माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक याच्या साम्राज्याला धक्का बसला व न्यूज आॅफद वर्ल्ड हे लोकप्रिय वृत्तपत्र बंद करावे लागले. कौल्सन (४६) याला ओल्ड बेली प्रकरणात लंडनमधील ओल्ड बेली न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. कौल्सनबरोबर त्याचे तीन साथीदार यांनाही आज शिक्षा सुनावण्यात आली. न्यूज आॅफ द वर्ल्डचा मजी प्रमुख रिपोर्टर नेवेली थर्लबेक (५२) माजी न्यूज एडिटर गे्रेग मिस्कीव (६४) याना सहा महिन्यांची शिक्षा झालेली आहे. पत्रकार जेम्स विदरअप याला चार महिन्यांच्या कम्युनिटी सेवेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य, अनेक सेलेब्रिटी हे हॅकिंग प्रकरणाचे बळी होते. कौल्सन हा सात आरोपींपैकी एक होता. २००० ते २००६ या कालावधीत हे हॅकिंग प्रकरण शिजले होते. न्यूज आॅफ द वर्ल्डची माजी प्रमुख रेबेका ब्रुक्स व इतर चार जण या प्रकरणात निर्दोष सुटले आहेत. (वृत्तसंस्था)
अँडी कौल्सन याला १८ महिन्यांची शिक्षा
By admin | Published: July 05, 2014 5:14 AM