शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, जाळपोळ; जुना ढाचा उद्ध्वस्त

By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 10:50 AM

पोलिसांकडून तपास सुरू; अद्याप कोणालाही अटक नाही

खैबर पख्तुनख्वा: पाकिस्तानात जमावानं एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाटमधील करक जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली. मंदिराच्या विस्तार कार्याला विरोध करण्यासाठी आलेल्या जमावानं मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवं बांधकामदेखील जमीनदोस्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी इरफान मरवत यांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. मंदिरावरील हल्ला आणि तोडफोड दुर्दैवी असल्याचं खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी म्हटलं. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला असून दोषींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं हिंदू समुदायाचे नेते पेशावर हारून सरबयाल यांनी म्हटलं. देशभरातील हिंदू कुटुंबं दर गुरुवारी मंदिराला भेटी द्यायचे. त्या ठिकाणी एका धार्मिक हिंदू नेत्याची समाधी आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.पाकिस्तानच्या लोकसंख्येचा विचार केला गेल्यास हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानातल्या हिंदूंची संख्या ७५ लाख इतकी आहे. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड होत असते. गेल्या महिन्यात सिंध प्रांतात कट्टरवाद्यांनी एका मंदिराचं नुकसान केलं. जुन्या कराचीतल्या शीतलदास कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. तोडफोड करण्यात आलेल्या प्राचीन मंदिराजवळ जवळपास ३०० हिंदू कुटुंब वास्तव्यास आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTempleमंदिर