ओस्लो : सूक्ष्मअर्थशास्त्राचे अभ्यासक असलेल्या ब्रिटिश वंशाच्या अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. उपभोग, गरिबी आणि विकास यातील विशेष अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.सूक्ष्मअर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र या विषयातील अभ्यासात त्यांनी मोलाची भर घातली आहे. आपले उत्पन्न ग्राहक कशा प्रकारे विभागून खर्च करतो. समाज उत्पन्नातील किती पैसा खर्च करतो आणि किती पैशांची बचत करतो, विकास आणि गरिबी मोजण्यासाठी मापदंड कोणते, या विषयांवर प्रा. डेटन यांनी मौलिक सिद्धान्त मांडले आहेत. ६९वर्षीय डेटन अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना साडेनऊ लाख अमेरिकी डॉलर मिळतील.
अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल
By admin | Published: October 13, 2015 4:28 AM