Animal Cruelty: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांसोबतच्या क्रूरतेचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो अमेरिकेतला असून, फोटो पाहून तुमचेही ह्रदय सुन्न होईल. एका लहान 3-4 महिन्यांच्या कुत्र्याच्या पिलावर बाण चालवल्याची घटना घडली आहे. हा बाण त्याच्या शरीराच्या आरपार घुसला.
या फोटोतील निष्पापावर केलेली वागणूक पाहून कोणाचेही हृदय हेलावेल. जनावरांना अशाप्रकारे वागणूक दिल्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही मुक्या जनावरांवर अत्याचार केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता व्हायरल झालेला जखमी पिल्लाचा फोटो अमोरिकेतील आहे. या चार महिन्यांच्या पिल्लाला कोणीतरी क्रूरपणे मारण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला.
सामाजिक संस्थेला सापडले पिलूअमेरिकेतील अॅनिमल सर्व्हिसेसला गळ्यात बाण मारलेल्या अवस्थेत चार महिन्यांचे पिल्लू सापडले. बाण जवळजवळ पिल्लाच्या शरीराएवढा लांब होता, जो त्याच्या मानेतून आरपार गेला होता. जखमी पिल्लाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हे चित्र पाहून लोकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. फोटो पाहून अनेकांना वाटले की कदाचित हे पिल्लू वाचणार नाही, पण आता ते धोक्याच्या बाहेर आहे.