शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

सिद्धू मुसेवाला ते बाबा सिद्दिकी...पाहा गँगस्टर अनमोल बिश्नोईची क्राइम रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 7:54 PM

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे.

Anmol Bishnoi Arrested: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी (18 नोव्हेंबर 2024) अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आले. याच महिन्यात त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. अनमोलचे नाव अनेक हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये सामील आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूप्रकरणीही अनमोलचे नाव पुढे आले आहे. गेल्या महिन्यातच मुंबई पोलिसांना अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अनमोल कॅलिफॉर्नियात लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवला होता.

एनआयनेही अनमोलविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून त्याचा शोध सुरू होता. एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या प्रत्यार्पणासाठी मकोकाच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

अनमोल बिश्नोईवर अनेक गुन्हेनॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अनमोल बिश्नोईचा शोध घेत होती, त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. एनआयएने 2022 मध्ये त्याच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते. तसेच, गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) विशेष न्यायालयात याचिका दाखल करत, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. 

किती गुन्हे दाखल?बाबा सिद्दिकी खून प्रकरण आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणासह अनमोल बिश्नोईविरोधात किमान 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 2022 मध्ये मूसवालाच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, 14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथे अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबारातही अनमोल बिश्नोईचे नाव पुढे आले होते. या घटनेची जबाबदारी त्यानेच घेतली होती. याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांना आरोपी बनवले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीBaba Siddiqueबाबा सिद्दिकी