शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 9:03 AM

यापूर्वी मलेशियानं जप्त केलं होचं PIA चं विमान

ठळक मुद्देयापूर्वी रक्कम न चुकवल्याप्रकरणी मलेशियानं जप्त केलं होती पीआयएचं विमानपीआयएच्या अमेरिकेतील, पॅरिसमधील हॉटेल विक्रीवरही बंधनं

पाकिस्तानला सध्या एकामागून एक झटके लागण्यास सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी पैसे न चुकवल्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान मलेशियानं जप्त केलं होतं. तसंच त्यातील प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या अमेरिका आणि पॅरिसमधील हॉटेल्सनादेखील अ‍ॅटॅच करण्यात आलं आहे. पाकिस्तानी माध्यमांमधील वृत्तानुसाप न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट हॉटेल आणि पॅरिसमधील स्क्राईब हॉटेल अ‍ॅटॅच करण्यात आले आहेत. प्रलंबित असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आता या हॉटेल्सची विक्री करता येणार नाही. ब्रिटनच्या उच्च न्यायालयानं पाकिस्तानच्या उच्चायोगाच्या खात्यातून २८.७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचे आदेशही दिले आहेत. पाकिस्तानकडून कर्ज न चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्ताननंही सरकारच्या दुतावासांच्या खात्यात केळ किमान रक्कम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मलेशियात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग-७७७ हे विमान जप्त करण्यात आलं होतं. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच ही कारवाई करण्यात आली होती. या विमानात तब्बल १७२ प्रवासी होते. यानंतर पाकिस्ताननं भाडेतत्त्वावर घेतलेलं अन्य विमानही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पाकिस्तानचं विमान जप्त करण्याची कारवाई झाल्यानंतर पाकिस्तान परदेशातील आपली संपत्ती विकण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तान मलेशियातील न्यायालयात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान तात्काळ सोडवण्यासाठी सुनावणी घेण्यास योग्य ती पावलं उचलत असल्याचं पीआयएकडून सांगण्यात आलं. तर दुसरीक़डे पाकिस्ताच्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून पीआयएनं २०१५ मध्ये दोन विमानं भाडेतत्त्वार घेतली असून कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर पैसे चुकवता आले नसल्याचं सांगितलं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानMalaysiaमलेशियाairplaneविमानAmericaअमेरिकाParisपॅरिसhotelहॉटेल