कॅनडातील आपली कमकुवत स्थिती खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमाने बळकट करण्याचा प्रयत्न करत असलेल्या जस्टिन ट्रूडो सरकारने आणखी एक घाणेरडे कृत्य केले आहे. जस्टिन ट्रूडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक ट्रेव्हल अॅडव्हायजरी जारी करत भारताच्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
या ट्रॅव्हल अॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्य कारणास्तव कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. मात्र, कॅनाडाने जारी केलेल्या या अॅडव्हायजरीत केंद्र शासित प्रदेश लडाखचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
याशिवाय, या अॅडव्हायजरीमध्ये, कॅनडाच्या नागरिकांना नॉर्थ ईस्टमधील राज्य आसाम, आणि मणिपूरमध्ये देखील न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाकिस्तानला लागून असलेल्या भागातही जाऊ नये - याशिवाय, पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राज्यांसंदर्भातही या अॅडव्हायजरीमध्ये निर्देश देण्यात आले आहेत. यात, पंजाब, राजस्थान आणि गुजरातचा समावेश करण्यात आला आहे. अॅडव्हायजरीनुसार, कॅनडायन नागरिकांना पाकिस्तान सीमेपासून 10 किमी भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण? -खालिस्तान समर्थक नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप केले आहेत. कॅनडाच्या संसदेत बोलताना, हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्ट्सचा हात असू शकतो, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे. यानंतर त्यांनी भारताच्या राजदुताला बर्खास्त केले. यावर भारतानेही याच पद्धतीची अॅक्शन घेत कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.