गेल्या काही वर्षांत चंद्रावर असंभव वाटणारे प्रोजेक्टदेखील संभव झाले आहेत. इस्रोचे चांद्रयान-3 हे याचे ताजे उदाहरण. मात्र आता, अमेरिकन अंतराळ संस्था नासा चंद्रावर एक अशक्य वाटणारी मोहीम शक्य करण्याच्या प्रयत्नात आहे. नासाच्या या प्रयत्नांना यश मिळाले तर, मानवाला चंद्रावर फेट-फटका मारणे सहज शक्य होईल. नासा चंद्रावर रेल्वे पट्री टाकण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तर जाणून घेऊयात काय आहे नासाचे मून एक्सप्रेस मिशन...?
अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, नासाची टीम चंद्रावर रेल्वे लाइनसाठी फंड देखील उभारत आहे. तसेच, हे शक्य झाले तर, हा मानव जातीच्या इतिसाहात एक मैलाचा दडग सिद्ध होईल, असेही नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
असा आहे नासाचा प्लॅन - या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसंदर्भात बोलताना नासाचे वैज्ञानिक जॉन नेल्सन म्हणाले, आपण याला विज्ञानाचा चमत्कार मानतो. त्यांच्या मते, ही मोहीम प्रत्यक्षात येण्याची शाश्वती नाही, मात्र, भविष्यात केव्हा तरी, हा चांद्रावरील रेल्वे प्रोजेक्ट एरोस्पेस मोहिमांचा भाग बनू शकतो. या प्रोजेक्टचा उद्देश चंद्रावर रेल्वे पट्री पसरवण्याबरोबरच, मंगळ ग्रहावर मानव आणि वस्तूंच्या ट्रान्सफरसाठी अत्यधुनिक प्रणाली विकसित करणे आहे. नासाचा हा प्रोजेक्ट इनोव्हेटिव्ह अॅडव्हॉनस्ड कॉन्सेप्ट्स (एनआयएसी) कार्यक्रमाचा भाग आहे. अशा प्रकारचे एकूण सहा प्रोजेक्ट सुरू आहेत.
प्रोजेक्टवर नासाला किती विश्वास? -वाशिंग्टनमधील नासाचे प्रमुख जॉन नेल्सन यांनी एनआयएसी कार्यक्रमासंदर्भात म्हटले आहे की, "या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या आमच्या सहकारी वैज्ञानिकांना काहीही अशक्य नाही. ते कुठलेही कार्य अश्यक आहे अथवा होऊ शकणार नाही, असे म्हणून सोडत नाहीत.