लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडून अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाही, तोच कोरोनाचा अधिक मोठी संसर्गशक्ती असलेला आणखी एक नवा विषाणू त्याच देशामध्ये आढळला आहे. द. आफ्रिकेहून ब्रिटनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत आलेल्या प्रवाशांपैकी दोन जणांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. या दोघांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे. ही घोषणा ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी एका पत्रकार परिषदेत केली. या अगदी नव्या विषाणूची संसर्गक्षमताही मोठी असून, त्यामुळे ब्रिटनचे सरकार अधिक दक्ष झाले आहे.कोरोना साथीचा वाढता प्रसार लक्षात घेता ब्रिटनमधील पूर्व व दक्षिण भागात लॉकडाऊनचे अधिक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा त्यानंतर आढळून आलेल्या नव्या विषाणूची संसर्गक्षमता ७० टक्के अधिक होती. आता त्यानंतर पुन्हा सापडलेला नवा कोरोना विषाणू आणखी संसर्गशक्तीचा आहे. त्याच्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात बरे झालेल्यांची संख्या ९७ लाखांच्या घरात
देशात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ९७लाखांच्या घरात पोहोचली असून त्यांचे प्रमाण आहे९५.७५%
देशात गुरुवारी सापडलेले रुग्ण२४,७१२बरे होणाऱ्यांची संख्या २९,७९१कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०१,२३,७७८बरे होणाऱ्यांचा आकडा ९६,९३,१७३