ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 13- दक्षिण ध्रुवावर असणाऱ्या अंटार्क्टिकात मोठा हिमनग अंटाक्टिकापासून तुटून वेगळा झाला आहे. या अती
मोठ्या हिमनगाचा आकार पाच हजार ८०० चौरस किलो मीटर असून च्या या हिमनगाचं वजन एक लाख कोटी टन आहे. अंटार्क्टिका समुद्राला आतापर्यंत पडलेला हा सर्वात मोठा तडा असल्याचं जाणकार सांगतात. नासाच्या संशोधकांनी उपग्रहाच्या माध्यमातून अभ्यास केला होता. काही महिन्यांपूर्वी या अभ्यासानुसार अंटार्टिकामध्ये स्थित्यंतराची शक्यता वर्तविली होती. समुद्रातून दोन दिवसांपूर्वी मोठा हिमनग वेगळा झाला असावा, असं संशोधकांनी म्हंटलं आहे. मुख्य समुद्रापासून हा हिमनग वेगळा झाल्याने समुद्राला मोठा तडा गेल्याचं दिसतं आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हिमनग वेगळा झाल्याने समुद्राच्या पातळीत बरीच वाढ होइल. तसंच दक्षिण ध्रुवावर जाणाऱ्या जहाजांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो.
या हिमखंडाला ‘ए६८’ असं नाव देण्याची येण्याची शक्यता आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटत असल्याचं नासाच्या ‘अॅक्वा मोडीस’ या उपग्रहाने टिपलं होतं. तसेच युरोपीय अवकाश संस्थेच्या सेंटीनेल-१ उपग्रहद्वारे हा हिमखंड तुटत असल्याचे निरिक्षण वर्षभरापासून नोंदविण्यात येत होतं.
आणखी वाचा
सलमानला सायकलिंगचे स्टंट शिकवणा-या अजय पडवळचा मृत्यू
इरोम शर्मिला यांची लगीनघाई
चलनातून बाद झालेल्या नोटा अद्याप मोजत आहोत - उर्जित पटेल
‘हा मोठा हिमनग तुटेल याकडे आमचं गेल्या अनेक महिन्यांपासून होतं. अखेरीस तो हिमनग तुटला. पण हा हिमनग तुटायला बराच काळ लागल्याचं आश्चर्य वाटलं’, असं ब्रिटनच्या स्वानसी विद्यापीठातील प्राध्यापक आंद्रियन लकमन यांनी सांगितलं आहे. हिमखंड तुटल्याच्या परिणामाचा आणि हिमखंडाच्या भवितव्याचा अभ्यास सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता या हिमनगाचं काय होणार, त्याचे परिणाम काय होणार, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
अंटाक्टिकातील हा हिमनग अनेक तुकड्यांमध्ये विभागला जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. या हिमखंडामुळे समुद्रपातळी लगेच वाढण्याची शक्यता नाही. मात्र, त्यामुळे सागरी वाहतुकीला धोका निर्माण होइल, असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.