आतापर्यंत अनेकांना हेच वाटत होतं की, पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात जीवन असेल. मग ते मनुष्याच्या रूपात असो वा जीवांच्या रूपात असो. पण एका नव्या रिसर्चमद्ये दावा करण्यात आला आहे की, पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे जिथे अजून जीवन पोहचलं नाही. आतापर्यंत असं समोर आलं की, जर एखाद्या ठिकाणी मनुष्य किंवा जीव नसेलही तरी तेथील मातीत सूक्ष्म जीव आढळतात. पण एका नव्या रिसर्चने ही गोष्टही खोट ठरवली आहे.
ब्रिघम यंग यूनिव्हर्सिटी आणि अमेरिकेत कोलोराडो विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी हा रिसर्च केला आणि यासाठी त्यांनी दूरवरच्या पर्वताची यात्रा केली. या रिसर्चनुसार, अंटार्कटिकाचे ट्रान्स अंटार्कटिक डोंगरावर अजूनही जीवन पोहोचणं बाकी आहे.
वैज्ञानिक याचा शोध घेत होते की, हजारो वर्षात मातीत जीवन कसं विकसित झालं. पण वैज्ञानिक तेव्हा हैराण झाले जेव्हा त्यांना इथे काहीच सापडलं नाही. येथील मातीत कोणत्याही मायक्रोबिअल DNA ची लक्षणे सापडली नाहीत. या रिसर्चचं नेतृत्व करत असलेले बायरन एडम्स म्हणाले की, एक ग्रॅम मातीत एक अब्जापर्यंत कोशिका असू शकतात. पण आम्हाला या मातीत एकही कोशिका सापडली नाही. विना मायक्रोब्स असलेली माती अजून कुठेच पाहिली गेली नाही.
२०४ मातीचे नमूने
हे बघून असं वाटतं की, हा एका अशा वातावरणाचा शोध आहे, जिथे जीवनाचा अंश नाही. हा रिसर्च जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च बायोजिओसायन्सेसमध्ये प्रकाशित केला गेला आहे. Shackleton Glacier region क्षेत्रातून एकत्र करण्यात आलेल्या २०४ मातीचे नमूने सामिल करण्यात आले होते. हे ग्लेशिअर साउथ पोलपासून साधारण ३०० मैल दूर आहे. हे नमूने सर्वात उंच ठिकाणाहून घेण्यात आले आहेत. इथे बर्फ नव्हता. येथून घेण्यात आलेल्या जास्तीत जास्त मातीत मायक्रोब्स आढळून आले. पण २० टक्के माती अशी होती, ज्यात जीवनाचा अंश नव्हता.