घसरल्यावर पडल्यावर किंवा अपघात झाल्यावर सर्वाधिक भीती ही हाड मोडण्याची असते. मात्र आता यापासून घाबरण्याची गरज नाही. कारण आता असं तंत्रज्ञान समोर आलंय जे हाड मोडण्यापासून बचाव करू शकणार आहे. काही काळ यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. मात्र एअरबॅगमुळे हे शक्य होणार आहे. तुम्ही कारमध्ये लागणाऱ्या एअरबॅग पाहिल्या असतीत. आता अशाच प्रकारच्या एअरबॅग तुम्हाला मानवी शरीरावर दिसतील. ही बाब तुम्हाला थोडीशी विचित्र वाटेल, मात्र हे सर्व एअरबॅगमुळेच शक्य होणार आहे.
कारमधील एअर बॅग्स अपघातावेळी प्रवाशांना दुर्घटनेपासून वाचवतात. अपघात होत असताना या एअरबॅग आपोआप उघडतात. आणि आणि अपघात झाल्यावर प्रवाशांचा गंभीर दुखापत होण्यापासून बचाव करतात. कारमध्ये लावण्यात येणाऱ्या एअरबॅगच्या तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने माणासांसाठी एअर बॅग तयार केल्या आहेत.
चिनी कंपनी Suzhou Yidaibao Intelligent Technology ने माणसांसाठी विशेषकरून वृद्धांसाठी स्पेशल एअर बँग बनवल्या आहेत. या एअरबॅग परिधान केल्यानंतर जर कुणी खाली पडले तर या एअरबॅग आपोआप उघडतात. त्यामुळे दुखापत होणार नाही. तसेच हाड मोडण्याचा धोकाही राहणार नाही.
या एअरबॅगमध्ये एक छोटासा डिव्हाइस लावलेला आहे. जेव्हा व्यक्ती पडते तेव्हा हे डिव्हाइस अॅक्टिव्ह होईल आणि एअरबॅग उघडले. दरवर्षी जगभरात कोट्यवधी लोक, विशेषकरून ज्येष्ठ नागरिक हे पडल्यामुळे जखमी होतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी हे डिव्हाइस उपयुक्त ठरू शकते.
बॉडी एअरबॅग वेस्ट एक बिल्ट-इन-कार-ग्रेड एअरबॅगने लेस आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पडते तेव्हा हात-पाय, मान, पाठ, मणक्याचं हाड यांना दुखापत होण्याची शक्यता असते. या एअरबॅग याच कमकुवत भागांना योग्य संरक्षण पुरवते. या एअरबँग २ हीलियम इन्फ्लेटर्सने सुसज्जित आहे. हे डिव्हाइस लावलेली व्यक्ती जेव्हा पडते. तेव्हा या यंत्रात लावलेले सेंसर्स सक्रिय होता. आणि ०.०८ सेकंदामध्ये एअरबॅग पूर्णपणे उघडतात. त्यामुळे व्यक्तीला दुखापत होत नाही. सध्या या अँटी फॉल एअरबॅगची किंमत 999 डॉलर किंमत एवढी आहे, तसेच त्या ऑनलाइन उपलब्ध आहेत.