Russia Ukrain War: युक्रेनला अँटी रेडिएशन पिल्सचा पुरवठा होऊ लागला? अण्वस्त्र हल्ला, अपघातापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 02:04 PM2022-09-01T14:04:39+5:302022-09-01T14:05:36+5:30
अणुदुर्घटना किंवा अणुहल्ला झाला तर त्यातून रेडिएशन निघते. अणुहल्ला झालाच तर त्यातून वाचणे जवळपास अशक्य असते.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध सहा महिने झाले तरी निर्णायक वळणावर आलेले नाहीय. यामुळे रशिया आता अण्वस्त्र हल्ले सुरु करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे युरोपियन युनियन युक्रेनला अँटी रेडिएशन औषधे पाठवू लागला आहे.
युक्रेनचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प अजूनही रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. युरोपातील सर्वात मोठा झापोरिझ्झ्या न्यूक्लियर प्लांट (झापोरिझ्झिया) युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर रशियन सैन्याने ताब्यात घेतला. रशियन सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथे अपघात किंवा रेडिएशन लीक होण्याचा धोका नेहमीच असणार आहे. युक्रेनला रेडिएशनविरोधी औषधाचे ५५ लाख डोस पाठवले जात आहेत. युरोपियन युनियनने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, अणु अपघाताची भीती लक्षात घेऊन 5.5 दशलक्ष पोटॅशियम आयोडाइड गोळ्या युक्रेनला पाठवण्यात येत आहेत. यापैकी 50 लाख युरोपियन युनियनला आणि 5 लाख ऑस्ट्रियाला पाठवले जात आहेत. त्याची किंमत 5 लाख युरो आहे.
अणुदुर्घटना किंवा अणुहल्ला झाला तर त्यातून रेडिएशन निघते. अणुहल्ला झालाच तर त्यातून वाचणे जवळपास अशक्य असते. अणुदुर्घटना झाली आणि किरणोत्सर्गाची गळती झाली तर त्यापासून बचाव करता येईल. हे औषध पोटॅशियम आयोडाइड आहे, जे शरीरातून किरणोत्सर्गी आयोडीन जाण्यास विरोध करते. थायरॉईड ग्रंथी प्रतिबंधीत होतात. किरणोत्सर्गी आयोडीन आत प्रवेश करू शकत नाही. किरणोत्सर्गी आयोडीन हे बाहेरून शरीरावर जमा होऊ लागते. साबण किंवा कोमट पाण्याने ते धुता येते. यामुळे बाहेरून किरणोत्साराचा परिणाम त्वचेवर जाणवत नाही.