ऑनलाइन लोकमत
प्योंगयांग, दि. 14 - उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जॉंग-उन यांच्या सरकारने कधीही अणुयुद्धाला सुरूवात होऊ शकते असं म्हणत अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेची वाटचाल पाहता ते संपूर्ण जगाला अणुयुद्धाच्या दिशेने नेत आहेत त्यामुळे केव्हाही अणुयुद्धाला सुरूवात होऊ शकते असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.
प्योंगयांग येथील उप मंत्री हान सॉन्ग योल यांनी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पेनिनसुला क्षेत्रात अशांतता निर्माण झाली असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे एअरक्राफ्ट कॅरिअर दक्षिण कोरियाच्या समुद्ई तटावर तैनात करणं चुकीचं आहे. असं करून अमेरिका आमची कुरापत काढत आहे. त्यांना जर युद्धच करायचं असेल तर कोणत्याही क्षणी आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत अशी धमकी त्यांनी दिली. ट्रम्प यांच्यामुळे तणाव निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले. डेली मेलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
ट्रम्प यांनी 13 एप्रिलला उत्तर कोरियाला इशारा दिला होता. जर चिन उत्तर कोरियाला वठणीवर आणण्यास असमर्थ ठरलं तर आम्ही त्यासाठी समर्थ आहोत असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना ट्रम्प यांच्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. ते उत्तर कोरियाच्या सैन्याला उकसवत आहेत. जर त्यांना युद्धच हवं असेल तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत, असे रयोलने धमकावले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करून उत्तर कोरियाला इशारा दिल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेला थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. अमेरिका संपूर्ण जगाला अणुयुद्धाच्या दिशेने नेत आहे. अमेरिकेने आमची कुरापत काढली तर कोणत्याही क्षणी आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत, असे उत्तर कोरियाने बजावले आहे. या धमकीमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Things will work out fine between the U.S.A. and Russia. At the right time everyone will come to their senses & there will be lasting peace!— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 13, 2017
याशिवाय उत्तर कोरियाकडून होणाऱ्या अणुचाचणी थांबणार नाहीत. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही अशा चाचण्या घेत राहू, असेही ते म्हणाले.