जगातला सर्वात उंच सक्रीय ज्वालामुखी अर्जेंटिनाच्या ऐडियन डोंगरांवर आहे. जेव्हा वैज्ञानिक इथे २२ हजार फूट उंचीवर गेले तर तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले. त्यांना इथे काही अवशेष सापडले. विश्लेषण केलं तर समोर आलं की, हे अवशेष एका १३ वर्षीय मुलाचे आहेत. त्याचा ममी एका कापडात गुंडाळलेला आढळून आला. त्याच्याजवळ एका चार-पाच वर्षाच्या मुलीचा आणि आणखी एका मुलाचे अवशेष सापडले. असं वाटत होतं की, ही घटना नुकतीच घडली. नंतर समोरं आलं की, हे ५०० वर्ष जुने अवशेष आहेत.
हे अवशेष दक्षिण अमेरिकेच्या Inca साम्राज्यावेळचे होते. आश्चर्याची बाब म्हणजे १.५ मीटर डोंगराखाली दबले असूनही त्यांचे आतील अवयव बघून असं वाटत होतं की, जणू मृत्यू नुकताच झाला आहे. टीम लीड करणारे पुरातत्ववादी डॉ. जोहान रेनहार्ड यांनी ही सर्वात चांगल्या प्रकारे संरक्षित करण्यात आलेली ममी म्हटलंय. त्यांनी स्मिथसोनियन चॅनलच्या डॉक्टुमेंट्रीमध्ये १९९९ मधील या शोधाबाबत सांगितलं.
ते म्हणाले की, जेव्हा ही ममी बाहेर आली तेव्हा पूर्णपणे झाकलेली होती. शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. कपडे चांगले होते आणि सगळं काही सुरक्षित होतं. ते असंही म्हणाले की, ही ममी उघडताना भीती वाटत होती की, ममी जागी तर होणार नाही ना. कारण ती जिवंत असल्यासारखीच वाटत होती. शरीर पूर्णपणे संरक्षित होतं. स्कीनपासून ते नखांपर्यंत सगळंकाही ठीक होतं. त्यासोबत काही सिरामिकच्या कलाकृती आणि दुसरे कपडेही होते.
रिसर्चमध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, या मुलांचा बळी दिला गेला होता. त्यांना मारण्याआधी त्यांना बेशुद्ध केलं गेलं असावं. असंही मानलं जातं आहे की, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत त्यांचा बळी दिला गेला असेल. असा कार्यक्रमांसाठी कॅलेंडरही होतं. वैज्ञानिकांना मुलाच्या केसांमधून काही नशेचे पदार्थ मिळाले. Inca काळात याचा वापर करण्यात आला होता. त्याला जेवणही वेगळ्या प्रकारचं दिलं जात होतं.