वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅरिझोना येथील प्रायमरीत विजय मिळविला, परंतु उटा येथे दोन्ही उमेदवारांना आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्वीकारावा लागला.अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्या राज्यात उमेदवार निवडीसाठी मतदान घेतले जात आहे.अॅरिझोनात ट्रम्प यांनी टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ आणि माजी विदेशमंत्री हिलरी यांनी बर्नी सँडर्स यांचा पराभव करून आपली स्थिती मजबूत केली. पण त्यानंतर काही तासांनीच दोन्ही पक्षातील दुसऱ्या स्थानावर असलेले क्रूझ आणि सँडर्स यांनी उटा येथे विजय मिळविला. (वृत्तसंस्था)
अॅरिझोना प्रायमरीत ट्रम्प-हिलरी विजयी
By admin | Published: March 24, 2016 12:41 AM