शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

'या' देशात सत्तापालट, बंडखोरीस नकार दिल्यामुळे लष्करानं पंतप्रधानांना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 2:54 PM

लष्कराने पंतप्रधानांसह काही उच्च अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आणि एका अज्ञात स्थळी नेले आहे.

खारतूम: उत्तर आफ्रिकन देश सुदानमध्ये राजकीय आणि आर्थिक संकट गडद होत आहे. सरकारच्या निर्णयांमुळे संतप्त लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. यातच लोकांनी सैन्याकडे बंडाचे आवाहन केले होते, यानंतर सुदानचे पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना सुरक्षा दलाच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी पंतप्रधान तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना सध्या एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे.

रॉयटर्सच्या माहतीनुसार, सुदानच्या सूचना मंत्रालयाने पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना सोमवारी सशस्त्र दलांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी बंडाचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा सैन्य दलाने पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अज्ञात ठिकाणी नेले.

सुदानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराने सोमवारी किमान पाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आहे. तसचे,  लोकशाही समर्थक सुदानचा मुख्य पक्ष असलेल्या सुदानीज प्रोफेशनल्स असोसिएशनने जनतेला संभाव्य लष्करी बंडाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केलं आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयGovernmentसरकार