इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्कर व त्यांच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स एजन्सी’-आयएसआय या गुपतचर संस्थेने राज्यघटनेने ठरवून दिलेल्या अधिकारकक्षेच्या चौकटीत राहावे आणि सरकारच्या इतर खात्यांच्या कामांत लुडबुड करणे बंद करावे, असा न भुतो आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालायने दिला आहे.पाकिस्तानमध्ये संसदीय लोकशाही असली तरी बऱ्याच बाबतीत लोकनियुक्त सरकार केवळ नामधारी असते व खरी सूत्रे सर्वशक्तिमान लष्कर व ‘आयएसआय’ पडद्यामागून हलवत असते. हे समीकरण झुगारण्याचा प्रयत्न करणाºया नेत्यास लष्कर सत्तेत टिकू देत नाही, हा इतिहास आहे. अशा लष्कराला उघडपणे त्यांची जागा दाखविण्याचे धार्ष्ट्य आजवर कोणी केले नव्हते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. शौकत अझिज सिद्दिकी यांनी अलिकडेच हा धाडसी आदेश दिल्याचे वृत्त ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ दैनिकाने दिले आहे. लष्कर आणि ‘आयएसआय’ यांनी सरकार व न्यायसंस्थेच्या मानगुटीवर बसून त्यांच्याकडून आपल्याला हवे ते करून घेण्याचे कारस्थान रचले आहे, असे धक्कादायक निरीक्षण नोंदवून न्या. सिद्दिकी यांनी या आदेशात म्हटले की, न्यायालयांतील प्रकरणांमध्ये कोण लुडबुड करते आणि त्याची सूत्रे कोण, कुठून हलवितो हे सर्वजण जाणून आहेत.>या संस्था स्वयंभू नाहीतकोर्टाने म्हटले की, लष्कर आणि ‘आयएसआय’ हे स्वयंभू नसून तेही पाक सरकारचाच एक भाग आहेत याची त्यांनी जाणीव ठेवावी. राज्यघटनेने शासनाच्या प्रत्येक अंगाची कर्तव्ये आणि अधिकार यांची चौकट ठरवून दिली आहे. त्यामुळे या दोघांनी आपल्या मर्यादांमध्ये राहून न्यायपालिका, प्रशासन, माध्यमे व सरकारच्या अन्ये विभागांच्या कामांत नाक खुपसणे बंद करावे.
पाक सरकारच्या कामात लष्कराने लुडबुड करू नये; इस्लामाबाद कोर्टाने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:03 AM