इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. इस्रायलकडून गाझामध्ये सतत्याने बॉम्बिंग केली जात आहे. यातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. "इस्रायल रफाहमध्ये सैन्य उतरवून हमासचा संपूर्ण खात्मा करेल," असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. मात्र, अमेरिकेसह अनेक देश इस्रायलवर राफापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकत आहेत.
महत्वाचे म्हणजे, राफा हे गाझापट्टीतील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात आहे. येथे 15 लाखहून अधिक लोक शरणार्थी म्हणून आहेत. वॉशिंगटनमध्ये पॅलेस्टाईन समर्थित एआयपीएसी संघटनेच्या कॉन्फ्रन्सला संबोधित करताना, आम्ही सामान्य नागरिकांची कुठल्याही प्रकारची हानी न होऊ देता रफाहमध्ये प्रवेश करू, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
इस्रायलने राफामध्ये ग्राउंड ऑपरेशन करू नये, अशी विनंती यूरोपीय संघातील नेत्यांनी केली असतानाच, नेतन्याहू यांचे हे वक्तव्य आले आहे. राफामध्ये लाखो पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतला असून त्यांना मदतही मिळत आहे. यामुळे इस्रायल सरकारने येथे ग्राउंड ऑपरेशन करू नये, असे युरोपियन काउन्सिलने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीही नेतन्याहू यांना इशारा दिला होता. यात, रेड लाइन क्रॉस करू नये आणि राफावर हल्ला करण्याचा विचार सोडून द्यावा, असे बायडेन यांनी म्हटले होते.