शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

जगभर : डेन्मार्कच्या व्हिक्टोरियाने गाजवली ‘मिस युनिव्हर्स’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 9:04 AM

miss universe 2024 : या सौंदर्य स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ शारीरिक सौंदर्य हाच त्याचा निकष नसतो, तर तुमची वैचारिक प्रगल्भता, ज्ञान, समयसूचकता या गोष्टीही त्यात तपासल्या जातात.

जगभरात महिलांच्या दोन सौंदर्य स्पर्धा अशा आहेत, ज्याकडे संपूर्ण विश्वाचं लक्ष लागून असतं. एक म्हणजे मिस युनिव्हर्स आणि दुसरी मिस वर्ल्ड. त्याची मुख्य कारणं दोन. पहिलं कारण या स्पर्धेमध्ये खरोखरच कमालीची चुरस असते. कोण जिंकेल आणि कोण हरेल, याचा अंदाज अखेरपर्यंत लागत नाही. या स्पर्धा जिंकणाऱ्या सौंदर्यवती तोडीसतोड असतात. अतिशय कमी फरकानं कोणी जिंकतं किंवा एखादीला बाहेर जावं लागतं. 

दुसरं कारण म्हणजे ज्या युवती ही स्पर्धा जिंकतात, त्या खरोखरच जगावर ‘राज्य’ करतात, कारण तोपर्यंत केवळ त्या-त्या देशापुरत्या मर्यादित असलेल्या या सौंदर्यवती संपूर्ण जगात प्रसिद्धी पावतात. किमान वर्षभर तरी त्यांचा बोलबाला असतोच, पण एकदा का या व्यासपीठाचं लेबल त्यांच्या मागे लागलं की, बऱ्याचदा पैशांच्या राशीही त्यांच्यामागे ओतल्या जातात. जगभरात अनेक कार्यक्रमांसाठी त्यांना बोलवलं जातं, बऱ्याचदा त्या हॉलीवूड आणि बॉलीवूड अभिनेत्री म्हणूनही चमकतात. शिवाय पुढच्या पिढ्यांवरही त्यांचा प्रभाव पडतो. त्यांच्याकडे पाहून येणारी नवी पिढी काही प्रमाणात का होईना आपल्या वाटचालीची दिशा ठरवतात.

या सौंदर्य स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ शारीरिक सौंदर्य हाच त्याचा निकष नसतो, तर तुमची वैचारिक प्रगल्भता, ज्ञान, समयसूचकता या गोष्टीही त्यात तपासल्या जातात. यंदाच्या ‘मिस युनिव्हर्स २००४’ या स्पर्धेत अनपेक्षितपणे बाजी मारली ती डेन्मार्कची २१ वर्षीय सौंदर्यवती व्हिक्टोरिया कजेर थेलविग या तरुणीनं.

१२५ देशांतील १३० सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील सर्वांना मागे टाकून तिनं विजेतेपद पटकावलं. भारताचं प्रतिनिधीत्व करणारी १८ वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघादेखील या स्पर्धेत होती. तिनंही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण शेवटी टॉप-१२मधून तिला बाहेर पडावं लागलं. नृत्य हे व्हिक्टोरियाचं पहिलं प्रेम आहे. लहानपणापासून ती नृत्याचा सराव करते. त्यात तिनं अप्रतिम कौशल्य मिळवलेलं आहे. युरोपियन आणि विश्व चॅम्पियनशिपसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही तिची वाहवा झाली आहे. नृत्य शिकता शिकताच त्या अनुभवाच्या जोरावर अल्पावधीतच एक नामवंत नृत्य प्रशिक्षक म्हणूनही तिनं नाव मिळवलं आहे.

बिझिनेस आणि मार्केटिंग या विषयांची पदवी तिनं मिळवलेली आहे. ‘डायमंड सेल्स’मध्ये तिचं प्राविण्य अफलातून आहे. त्यामुळे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्येही तिनं आपलं बस्तान बसवलेलं आहे. एक उभरती उद्योजिका म्हणून तिचं मोठं नाव आहे. आपल्या क्रिएटिव्हिटीचा व्यवसायात तिनं पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. इतकं सारं असूनही तिला अजूनही बरंच काही करायचं आहे. जगातील नामांकित अशा हार्वर्ड विश्वविद्यालयातून तिला कायद्याची पदवी घ्यायची आहे. समाजाशी आपली नाळ निगडित असते आणि समाजाप्रति कायमच आपली जबाबदारी असते, असं तिचं मानणं आहे. त्यामुळे समाजात विधायक बदल घडवण्यासाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ती स्वत:ही हिरीरीनं सहभागी असते. 

तरुणांनी घरात बसून राहण्यापेक्षा, मोबाइल आणि समाजमाध्यमांवर टाइमपास करण्यापेक्षा घरातून बाहेर पडून मैदानावर यावं, आपल्यातली रग, कौशल्य दाखवावं, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त बनावं, यासाठी ती कायमच सक्रीय असते. एवढंच नाही, प्राण्यांच्या हक्कांसाठीही ती कायम पुढे असते. आपल्याला जसा जगण्याचा हक्क आहे, तसाच हक्क प्राण्यांनाही आहे, त्यामुळे मानवानं प्राण्यांच्या हक्कांवर गदा आणू नये, यासाठी ती हिरिरीनं प्रचार करीत असते. 

व्हिक्टोरिया स्वत: तर सौंदर्यवती आहेच, पण उद्योजक म्हणूनही ती झपाट्यानं पुढे येते आहे. ‘सौंदर्य उद्योजक’ म्हणून आपल्या कामाचा ठसा तिनं निर्माण केला आहे. इतक्या लहान वयात विविध क्षेत्रांत ती कार्यरत असल्यानं तरुणाईतही ती प्रचंड लोकप्रिय आहे.  आपलं सौंदर्य, बुद्धिमत्ता, इतरांप्रति करुणा, सेवा आणि समर्पणवृ्ती या साऱ्याच्या संयोगामुळे स्पर्धेतील तिची दावेदारी मजबूत झाली आणि तिच्या गळ्यात या स्पर्धेचं विजेतेपद पडलंच. व्हिक्टोरिया एखाद्या सुंदर बाहुलीसारखी दिसते, त्यामुळे ‘ह्यूमन बार्बी’ म्हणूनही ती ओळखली जाते. 

सुष्मिता, लारा, हरनाजचं स्पर्धेवर ‘नाव’ १९५२ साली कॅलिफोर्नियाच्या लॉंग बीच शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. आजवर सुष्मिता सेन (१९९४) , लारा दत्ता (२०००) व हरनाज कौर संधू (२०२१) या भारतीय सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकली आहे. अमेरिकेने ७ वेळा, व्हेनेझुएलाने ६ वेळा, तर पोर्तो रिकोने ५ वेळा मिस युनिव्हर्स जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. भारताच्या रिया सिंघाला यंदा या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं असलं, तरी तिनंही सुरुवातीला या स्पर्धेत आपली छाप सोडली होती.  

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीMiss Universeमिस युनिव्हर्सDenmarkडेन्मार्क