शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

ICC नं काढलं अरेस्ट वॉरंट; भारत दौऱ्यावर आल्यावर पुतिन यांना अटक होऊ शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 2:36 PM

व्लादिमीर पुतिन हे रशियासारख्या ताकदवान देशाचे राष्ट्रपती आणि जगातील टॉप पॉवरफूल नेत्यांपैकी एक आहेत

नवी दिल्ली - १७ मार्च २०२३ रोजी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजे ICC नं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात वॉर क्राईम आरोपात अरेस्ट वॉरंट काढले आहे. ICC नं पुतिन यांना वॉर क्राईमसाठी आरोपी बनवले. यूक्रेनमधील लहान मुलांना बेकायदेशीरपणे रशिया घेऊन जाण्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यूक्रेनच्या मुलांचे अपहरण करून त्यांना रशियाला घेऊन जात असल्याची माहित पुतिन यांना होती. मुलांच्या अपहरणाचे प्रकरण थेट पुतिन यांच्याशी जोडले आहे. पुतिन यांना माहिती असतानाही त्यांनी त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांना आणि इतरांना हे करण्यास रोखले नाही असा ठपका त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठेवला आहे. 

ICC अरेस्ट वॉरंटनंतर पुतिन यांना अटक होणार? व्लादिमीर पुतिन हे रशियासारख्या ताकदवान देशाचे राष्ट्रपती आणि जगातील टॉप पॉवरफूल नेत्यांपैकी एक आहेत. अशावेळी रशियात त्यांना अटक करणे शक्य नाही हे निश्चित आहे. परंतु पुतिन रशियाच्या बाहेर पडून दुसऱ्या देशात गेले तर त्यांना अटक करण्यात येऊ शकते. परंतु सध्या पुतिन यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यामुळे ते रशियासोडून बाहेरच्या देशात जाण्याची शक्यता कमी आहे. पुतिन यांना भारतात अटक होऊ शकते?ICC अरेस्ट वॉरंट जारी झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन भारतात आल्यावर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकत नाही. त्यामागे २ कारणे आहेत. भारत हा ICC सदस्य देशांमध्ये सहभागी नाही. १९९८ मध्ये भारताने रोम करारावर स्वाक्षरी केली नाही. अशावेशी ICC ने वॉरंट जारी केला आहे. ते भारतासाठी बंधनकारक नाही. जर भारत ICC चा सदस्य असता तरीही तो आदेश मान्य करण्याचं बंधन नसते. याचे कारण म्हणजे ICC चं वॉरंट त्यांच्या सदस्य देशांसाठी एक सल्ला म्हणून असते. 

२०१५ मध्ये अशीच एक संधी होती जेव्हा सूडानचे राष्ट्रपती उमर हसन अहमद अल बशीर भारताच्या दौऱ्यावर आले. ते भारतात होणाऱ्या इंडिया-आफ्रिका समिटमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यावेळी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने उमर हसन यांना अटक करून त्यांच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. २००९ मध्ये आयसीसीने बशीर यांच्याविरोधात सूडानमध्ये वॉर क्राईम आरोपाखाली अरेस्ट वॉरंट जारी केले होते. 

ICC पुतिन यांना कधीच अटक करू शकत नाही?इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाकडे राष्ट्रपती पदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार नाही. मात्र, अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पुतिन आयसीसी सदस्य देशांच्या दौऱ्यावर गेल्यास त्यांना ताब्यात घेऊन खटला सुरू केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, पुतिन यांच्याकडून अशी चूक होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत त्यांना ताब्यात घेऊन खटला चालविल्याशिवाय त्याच्या अटकेची शक्यता नाही.

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिन