क्रुर तानाशाह अडॉल्फ हिटलरच्या काळातील "नाझी सलाम" करणाऱ्या एका खेळाडुची संघातून हकालपट्टी केल्याची घटना घडली आहे. रशियन गो-कार्टर रेसर आर्टेम सेवेरिउखिनला(Artem Severiukhin) संघ व्यवस्थापनाने संघातून काढून टाकले. पोर्तुगालमध्ये रविवारी सीआयके-एफआयए युरोपियन कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आर्टेमने व्यासपीठावर "नाझी सलामी" दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
इटलीच्या ध्वजाखाली घेतला होता भाग कठोर युद्धविरोधी नियमांमुळे रशियन ड्रायव्हर्स त्यांच्या देशाच्या ध्वजाऐवजी इटलीच्या ध्वजाखाली खेळत आहेत. या शर्यतीत रशियाचे राष्ट्रगीतही वाजवले गेले नाही. परिणामी, सेवेरिउखिननेही इटालियन ध्वजाखाली शर्यतीत भाग घेतला होता. या शर्यतीत आर्टेम विजयी झाला. विजयोत्सवादरम्यान त्याने अडॉल्फ हिटलरच्या काळातील नाझी सलाम केला. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
सेवेरिउखिनने नेमके काय केले?विजयानंतर व्यासपीठावर सेवेरिउखिनने त्याच्या छातीवर थाप मारली आणि उजवा हात धरला. असाच हावभाव अॅडॉल्फ हिटलर आणि इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा होता. परंतू, सेवेरिउखिनने नाझींना सलामी दिली नसल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, त्याने त्याचे मित्र आणि कुटुंबाकडे पाहून असा हावभाव केला आहे.
त्या कृत्याची चौकशीफेडरेशनने एफआयए कार्टिंग युरोपियनने आर्टेम सेवेरिउखिनच्या अस्वीकार्य वर्तनाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे खेळाडूवर कायमची बंदी घातली जाऊ शकते. एफआयएच्या निवेदनात म्हटले की, याप्रकरणी उचलल्या जाणार्या पावलांबाबत लवकरच माहिती देईल.