आर्टिमिस 2 मोहिमेसाठी नासाने चार अंतराळवीरांची निवड केली आहे. हे अंतराळवीर पुढच्या वर्षाच्या सुरुवातील चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येणार आहेत. अपोलो मोहिमेच्या ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा मानव चंद्राच्या जवळ जाईल. आर्टिमीस-२ एक फ्लायबाय मिशन आहे. म्हणजेच अंतराळवीर हे ओरियन स्पेसक्राफ्टमध्ये बसून, चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून चंद्रावर परत येतील.
नासाच्या आर्टिमिस २ या मोहिमेसाठी खालील चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये क्रिस्टिना एच. कोच (मिशन स्पेशालिस्ट, अमेरिका), जेरेमी हेनसन (मिशन स्पेशालिस्ट, कॅनडा), व्हिक्टर ग्लोव्हर (पायलट, अमेरिका), ली वाइसमेन (कमांडर, अमेरिका) यांचा समावेश आहे.
या चार अंतराळवीरांमधील एक कॅनडातील आहेत. उर्वरीत तिघे अंतराळवीर हे अमेरिकेतील आहेत. या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा ही ह्युस्टन येथील जॉनसन स्पेस सेंटरमध्ये करण्यात आली. पाच दशकांहून अधिक वेळानंतर आर्टिमिस २ मोहीम ही चंद्रावरील मानवाची पहिलीच अंतराळ मोहीम असेल. मात्र या दरम्यान, अंतराळ यान चंद्रावर उतरणार नाही. तर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. या मोहिमेच्या यशानंतर आर्टिमिस ३ मोहीम २०२५ मध्ये आखली जाईल. या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर उतरतील.