इस्लामाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. तसेच काश्मीर मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्पना सांगितलं. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. ते म्हणाले, काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता पुढच्या महिन्यात हा मुद्दा जागतिक स्तरावर UNGAमध्ये उपस्थित करणार आहोत.काश्मीरसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. आता बालाकोटसारखे हल्ले भारत पुन्हा करू शकणार नाही. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत काश्मीरचा मुद्दा आम्ही लावून धरू, असंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे.
इम्रान खान यांची पुन्हा दर्पोक्ती; भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 7:42 PM