शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आर्टिक्टवरील बर्फ वितळणार

By admin | Published: May 11, 2017 12:27 AM

जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे. आमच्या हिमनद्या हळूहळू अस्तंगत होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे आतापर्यंत म्हटले जात होते; मात्र आता कळले आहे की, हा वेग आपण समजत होतो त्याहून अधिक आहे. आकडेवारी भीतिदायक आहे. १९७५ ते २०१२ दरम्यान आर्टिक्ट बर्फाची जाडी ६५ टक्क्यांनी घटली आहे. दोन्ही धु्रव आणि उष्णकंटीबंधीय प्रदेशांमध्ये तापमानात असलेल्या फरकामुळे पृथ्वीच्या मोठ्या भूभागात वारे वाहतात. जर आर्टिक्टचे तापमान उष्णकटीबंधीय प्रदेशाच्या तुलनेत वेगाने वाढले, तर पृथ्वीवर अनपेक्षित ठिकाणी अवकाळी उष्णतेची लाट येईल आणि हा मानवी जीवनासाठी चिंतेचा विषय आहे. आर्टिक्टच्या पर्माफ्रॉस्टमध्ये (बर्फाने झाकलेला मातीचा थर) मोठ्या प्रमाणात जैवपदार्थ आहेत. बर्फ वितळल्यामुळे हे पदार्थ उष्णतेने जळून कॉर्बन डायक्साईड किंवा मिथेनच्या रूपात वातावरणात मिसळतील. त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणखी तीव्र होईल. आर्टिक्टच्या ग्रीनलॅण्ड पट्ट्यात पृथ्वीच्या दहा टक्के गोडे पाणी आहे. जर तेथील बर्फ वितळला तर समुद्राची पाणीपातळी या शतकाच्या अखेरीस ७४ से. मी. हूनही अधिक वाढेल. ही बाब समुद्रकिनारी वसलेल्या शहरांसाठी धोकादायक ठरू शकते. मानवाने गेल्या एका शतकात निसर्गात जेवढी ढवळाढवळ केली तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती. याच एका शतकात जगाची लोकसंख्याही खूप वेगाने वाढली. मानवाने आपल्या गरजांसाठी अनेक शोध लावून निसर्गात एवढी ढवळाढवळ केली की, पर्यावरणाचे संतुलनच बिघडून गेले. जगभरातील हवामानात बदल घडतील-तापमानवाढीमुळे तीन दशकांत आर्टिक्टवरील बर्फाचे क्षेत्रफळ जवळपास निम्मे झाले आहे. आर्टिक्टकौन्सिलचा ताजा अहवाल स्नो, वॉटर, आइस, पर्माफ्रॉस्ट इन द आर्टिक्टनुसार, बर्फ वितळण्याचा वेग पाहता २०४० पर्यंत आर्टिक्टवरील बर्फ पूर्णपणे वितळून जाईल. आर्टिक्टवरील बर्फ २०७० पर्यंत वितळून जाईल, असा अंदाज पूर्वी व्यक्त करण्यात येत होता; मात्र हवामानातील असामान्य बदलामुळे ही दुर्दैवी वेळ लवकर येईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.गेल्या सात मार्च रोजी आर्टिक्टवरील बर्फाचे प्रमाण अत्यंत कमी होते. तज्ज्ञांच्या मते, तापमानवाढीमुळे येत्या काही वर्षांत जगभरातील हवामानात भयंकर बदल दिसतील.आर्टिक्टवरील बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात अनेक भयंकर बदल घडून येऊ शकतात. हा अहवाल आंतरराष्ट्रीय नियतकालिक द इकोनॉमिस्टमध्ये प्रकाशित झाला आहे.