न्यूयॉर्क - लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आता पूर्णपणे इलॉन मस्क यांच्या मालकीची झाली आहे. ट्विटरची मालकी मिळताच मस्क यांनी पराग अग्रवाल यांना कंपनीच्या सीईओ पदावरून हटवले आहे. एवढ्या मोठ्या कायापालटानंतर ट्विटरवर एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. तो एक फिचर म्हणून करण्यात आला आहे. ट्विटर युझर्सना आता एक असं फिचर मिळार आहे ज्यामाध्यमातून त्यांना खास सवलत मिळणार आहे.
ट्विटरवर आता युझर्सना एक नवं फिचर पाहायला मिळणार आहे. त्याला डाऊनवोट असं नाव देण्यात आलं आहे. जर तुम्ही नावावरून या फिचरबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही गोंधळून जाल. कारण डाऊनवोटचं नाव ऐकून तुम्हाला हे यूट्युबवर मिळणाऱ्या डिसलाईक बटणसारखं असेल, मात्र प्रत्यक्षात ते तसं नाही आहे.
तुम्ही पाहिले असेल की जेव्हा तुम्ही ट्विट करता तेव्हा अनेकदा लोक त्यावर काही आक्षेपार्ह अपमानास्पद टिप्पण्या करतात. त्यामुळे अनेक युझर्सनां अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे नवे डाऊनवोट फिचर आणण्यात आले आहे.
या फिचरच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचं ट्विट न आवडल्यास तुम्ही डाऊनवोट करू शकता. हे फिचर पोस्टच्या रिप्लायसाठी मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे, ते कुणाचाही अवमान करणार नाही. तसेच कुणालाही आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याची परवानगी देणार नाही.
पोस्टवर युझर्स उलटसुलट कमेंट्स करत असतात. अनेकदा ट्विट करणाऱ्यांची भाषा खूप घसरते, त्यामुळे ट्विट करणाऱ्या व्यक्तीलाही अवघडल्यासारखे होते. असं होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे खूप युझर्सना फायदा होईल. विशेषकरून व्हेरिफाईड युझर्सना त्यामुळे खूप मदत मिळेल.