रोम - विमानतळावरूनविमानाने उड्डाण करताच त्याचा टायर निखळून खाली पडल्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विमानाचा एक टायर अचानक निखळून खाली पडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये टायरला आग लागल्याचेही दिसत आहे.
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार ही घटना इटलीमधील टारंटो एअरपोर्टवर घडली आहे. येथे अॅटलस एअरचं ड्रीमलिफ्टर बोईंग ७४७ विमान उड्डाण करणार होतं. जेव्हा या विमानाने उड्डाण केलं त्यानंतर काही क्षणातच विमानाच्या मेन लँडिंग गिअरचा टायर निखळलं आणि खाली पडला. विमानात बसलेल्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना आली नाही. मात्र ग्राऊंड स्टाफने याची माहिती त्यांना दिली.
या प्रकारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र हे विमान इतर चाकांच्या मदतीने अमेरिकेत सुरक्षितरीत्या उतरवण्यात आलं. बोईंगने याबाबत माहिती देताना सांगितले की, या कार्गो विमानाने अमेरिकेतील चार्ल्स्टन इंटरनॅशनल विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडिंग केले आहे. सध्या या अपघातामागच्या कारणांचा तपास सुरू आहे. हे चाक विमानापासून निखळून खाली पडताना आगही लागल्याचे दिसून आले.
दरम्यान, विमानापासून निखळलेल्या चाकाचे वजन सुमाने १०० किलो आहे. ह टायर विमानतळाजवळच्याच एका शेतामध्ये पडलेला सापडला. अपघातानंतर एक व्हिडीओही दिसत आहे. तसेच त्यातून धूर येतानाही दिसत आहेत.