शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
3
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
4
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
5
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
7
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
8
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
10
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
11
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
12
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
13
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
15
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
16
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
17
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
18
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
19
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
20
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त

युद्धविराम संपताच पुन्हा युद्ध! हमासनं केलं शांतीचं आवाहन, इस्रायल म्हणाला सोडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 1:53 PM

गाझा पट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवाई हल्ले झालेले नाहीत. यामुळे येथे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा येथील लोकांना आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात शांततेसाठी युद्धविरामावर सहमती झाली होती. यामुळे गुरुवारपर्यंत (29 नोव्हेंबर) युद्ध अथवा हल्ले बंद आहेत. या युद्धविरामादरम्यान हमास आपल्या कैदत असलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करत आहे. तर इस्रायल आपल्या कारागृहात बंद असलेल्या पॅलेस्टाइनच्या कैद्यांची सुटका करत आहे.

गाझा पट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवाई हल्ले झालेले नाहीत. यामुळे येथे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा येथील लोकांना आहे. सयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडून गाझापट्टीत सातत्याने मदत पोहचवली जात आहे. आपण गाझातील पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी 29,494 किलो मानवी मदद पाठवल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. 

इस्रायली सैन्यदलाचे प्रवक्ता डॅनियल हगरी यांनी युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. बंधकांना युद्धविरामच्या माध्यमाने अथवा युद्ध करून देशान आणले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, इस्रायली सैन्यदलाच्या इतर अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनीही म्हटले आहे. 

आम्ही हमासला उखडून टाकू -भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन म्हणाले, 'युद्धविराम संपताच आम्ही पुन्हा आमच्या मिशनवर परतू. यानंतर आम्ही तेच करणार, जे आम्ही ठरवलेले आहे. आम्ही हमासला उखडून टाकू.' त्यांनी पुन्हा एकदा युद्ध सुरू करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

जेनिन शरणार्थी कँपमध्ये एका घरावर ड्रोन हल्ला -अलजजीराने दिलेल्या वृत्तानुसार, वेस्ट बँकच्या जेनिन शरणार्थी कँपमध्ये एका घरावर ड्रोन हल्ला झाला आहे. याशिवया इस्रायलने शहरातून डझनावर लोकांना अटकही केली आहे. याशिवाय, जेनिनमध्ये बऱ्याच रुग्णालयांबाहेर इस्रायली सेन्यही उभे आहे. तसेच जखमी लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्ध