शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

पीपीपी नेत्या टाळ्या वाजवत होत्या अन् अचानक चेहऱ्यावर धडकले ड्रोन, व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 11:58 AM

एका कार्यक्रमावेळी मीडिया चॅनलचे ड्रोन त्यांना धडकले. या घटनेमुळे त्या जखमी झाल्या. त्यांच्या डोळ्यांना काही टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील खानेवालमध्ये इम्रान सरकारविरोधात प्रचार करणाऱ्या पीपीपी (PPP) नेत्या आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या कन्या असिफा भुट्टो यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. एका कार्यक्रमावेळी मीडिया चॅनलचे ड्रोन त्यांना धडकले. या घटनेमुळे त्या जखमी झाल्या. त्यांच्या डोळ्यांना काही टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीपीपी नेत्यांकडून शुक्रवारी पाकिस्तानमधील खानवाल भागात आंदोलन करण्यात आले. सध्याच्या इम्रान सरकारच्या विरोधात पीपीपी नेते एकत्र आले होते. या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मोठा जनसमुदायही यावेळी उपस्थित होता. पण एका मीडिया चॅनलचा ड्रोन अचानक पीपीपी नेत्या असिफा भुट्टो यांच्यावर धडकला आणि त्या जखमी झाल्याचे बोलले जात आहे. 

या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. याबाबत बिलावल भुट्टो म्हणाले की, हा फक्त अपघात आहे की कोणाचे तरी कट कारस्थान आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, बिलावल भुट्टो यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी ड्रोन ऑपरेटरला पकडले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या पंजाब सरकारचे प्रवक्ते हंसन खवर यांनी सांगितले की, डॉ. बाबर यांना घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. ते स्वत: कंटेनरमध्ये गेले आणि त्यांनी असिफा यांच्यावर उपचार केले. असिफा यांच्या डोळ्यावर खरसटले असून हातावर जखमा झाल्या आहेत. आधी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले होते, मात्र आसिफा यांनी पट्टी बांधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

(पाकिस्तानी चॅनल डॉनने हा व्हिडिओ शेअर केला आहे)

दरम्यान, त्यांचा पट्टी बांधलेला एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, पाकिस्तान सरकारचे अनेक मंत्री आणि इतर नेते सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असिफा यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत आहेत. याशिवाय, या आंदोलनाबाबत बोलायचे झाले तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधात 27 फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती.  8 मार्चला इस्लामाबादला पोहोचण्याची तयारी सुरू आहे. एकूण 34 जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर हा पीपीपी मोर्चा येथे पोहोचणार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलImran Khanइम्रान खान