येणाऱ्या काळात आशिया आणि अमेरिका मिळून अमेशिया नावाचा एक नवा खंड तयार होईल, अशी मोठी भविष्यवाणी वैज्ञानिकांनी केली आहे. आर्कटिक महासागर आणि कॅरेबियन समुद्र पुढील 20 ते 30 कोटी वर्षांमध्ये गायब होतील. याचा परिणाम म्हणून अमेशिया नावाचा एक नवा महाखंड तयार होईल. ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ आणि चीनच्या पेकिंग विद्यापीठातील संशोधखांनी ही भविष्यवाणी केली आहे.
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्रशांत महासागर वर्षाला सुमारे एक इंच कमी होत आहे. यामुळे अमेरिका आणि आशिया खंड भविष्यात कधीतरी एक होतील आणि अमेशिया नावाचा एक नवा खंड तयार होईल.
नॅशनल सायन्स रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित एक रिसर्चचे मुख्य लेखक डॉ. चुआन हुआंग म्हणाले, "गेल्या दोन अब्ज वर्षांमध्ये पृथ्वीचे खंड दर 60 कोटी वर्षांत एक महाखंड बनण्यासाठी एकमेकांना धडकले आहेत. याला महाखंड चक्र म्हणूनही ओळखले जाते. याचाच अर्थ, सध्याचे खंड 20-30 कोटी वर्षांनी पुन्हा एकदा धडकणार आहेत."
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. यामुळेच पृथ्वीचे खंड निर्माण झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, नवा खंड पृथ्वीच्या शीर्ष स्थानी निर्माण होईल आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे सरकेल. अध्ययनानुसार, युरेशिया आणि अमेरिका प्रशांत महासागराकडे सरकत आहेत. तसेच, ऑस्ट्रेलिया आधीपासूनच दरवर्षी जवळपास 7 सेंटीमीटरने आशियाकडे सरकत आहे.