नैरोबी (केनिया)- केनियातील गॅरिसा विद्यापीठावरील हल्ल्याने मानवता सुन्न झाली. अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या या नरसंहाराने अवघे जग हादरले. अमानुषपणा आणि क्रौर्याची सीमा लांघत अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून बेछूटपणे गोळ्या घातल्या, असे या हल्ल्यातून सुदैवाने बचावलेल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितले.धर्मग्रंथ वाचण्यास सांगून केली खातरजमाअब्दुल रहमान गुरुवारी उष:काली आलेल्या काळरात्रीचा साक्षीदार आहे. दहशतवाद्यांनी आम्हाला दरडावून पालथे पडण्यास सांगितले. माझ्याजवळ आलेल्या दहशतवाद्याने मला धर्म विचारला. मी मुस्लिम असल्याचे सांगितल्यानंतर त्याने मला धर्मग्रंथ वाचण्यास सांगून खातरजमा केली व दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळविला. त्यांनाही धर्माबाबत विचारणा केली. ज्यांना धर्मग्रंथ वाचता आला नाही, त्यांना दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळ्या घातल्या.
धर्म विचारून गोळ्या घातल्या
By admin | Published: April 05, 2015 2:11 AM