शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘त्या’ लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही! आज किंवा उद्या पृथ्वीजवळून जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 7:31 AM

अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबई :  ७४८२ (१९९४ पीसी वन) हा लघुग्रह १८ किंवा १९ जानेवारी रोजी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असल्याची बातमी सर्वत्र गेली आहे, त्यात काहीही तथ्य नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. अशी काही दुर्घटना घडेल, याबद्दल भीती बाळगण्याचे काही कारण नाही. १.१ किमी व्यासाचा हा लघुग्रह पृथ्वीपासून १९ लक्ष ८१ हजार ४६८ किमी. अंतरावरून जाणार आहे. हे अंतर पृथ्वी-चंद्र अंतराच्या साडेपाच पटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे सोमण यांनी सांगितले.७४८२ (१९९४ पीसीवन) या लघुग्रहाचा शोध ९ ऑगस्ट १९९४ रोजी रॉबर्ट मॅकनॉट यांनी स्लाइडिंग स्प्रिंग वेधशाळेतून लावला. हा लघुग्रह ५७२ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मात्र, कधी कधी तो पृथ्वीच्या जवळून जातो. १७ जानेवारी १९३३ रोजी तो पृथ्वीजवळून गेला होता. आता यानंतर १८ जानेवारी २१०५ रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे. अशाप्रकारे पृथ्वीजवळून भ्रमण करणाऱ्या हजार लघुग्रहांचा तपशील शास्त्रज्ञांना मिळाला आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे हे अगोदर समजल्यास त्याचा मार्ग बदलणे किंवा तो आदळण्यापूर्वीच त्याचे तुकडे करणे यावरही संशोधन सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत, असे सोमण यांनी सांगितले.हे माहिती आहे का?१९०८ मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात ६० मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात १० किमी व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासोर नष्ट झाले होते. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा २० लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता.