चीनमध्येभूकंप झाला असून यामध्ये तब्बल 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दक्षिणपूर्व भागात 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपामुळे घरांचं, इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. काही भागातील वीज गायब झाली आहे. काही ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरू आहे.
सिचुआन प्रांतात 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर इमारतींना हादरे बसले, त्या जोरजोराने हलू लागल्या. यामुळे एकच गोंधळू उडाला. लोक भीतीने घराबाहेर पडले आणि ओरडू लागलं. लुडिंग काउंटी हे या भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगितलं जात आहे. मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकल्याचं सांगण्यात येत आहे.
सिचुआन प्रांतांत भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. याचे काही व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. 2008 साली सिचुआन प्रांतात आलेल्या भूकंपाने तब्बल 70 हजार जणांचा जीव घेतला होता. 2013 सालीदेखील इथं भूकंप झाला होता. त्यावेळी 200 जणांचा मृत्यू झाला होता. 2013 साली आलेल्या भूकंपाची तीव्रता सात रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे हा भाग नेहमीच संवेदनशील राहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.