दक्षिण अमेरिकेतील चिली येथील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत जंगल परिसरातील ४६ जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, ११०० पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत.
आगीच्या दुर्घटनेनंतर तत्काळ प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ९२ जंगलं या आगीच्या तडाख्यात सापडली असल्याचं चिलीचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री कैरोलिना टाहो यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आगीतील मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
विला इंडिपेंडेंसिया येथील अनेक घरं आणि व्यवसायिक दुकानांचे या आगीत जळून नुकसान झाले