टोकियो : जपानमधील नागासाकी शहरावर अणुबॉम्बचा हल्ला झाला त्याला रविवारी ७० वर्षे पूर्ण झाली. नागासाकी येथील अणुबॉम्ब हल्ल्याने ७४ हजार लोकांचा बळी घेतला होता. या स्मृतिदिनानमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान अॅबे यांच्या सैन्य विस्ताराच्या प्रयत्नावर कडाडून टीका करण्यात आली. सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३२ वाजता) घंटा वाजल्या आणि हजारो लोकांनी एक मिनिटाची स्तब्धता पाळून या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. ९ आॅगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब पडला होता. अमेरिकेच्या जपानमधील राजदूत कॅरोलिन केनेडी यांच्यासह जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या कार्यक्रमास ७५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेच्या स्मृतिदिनी अण्वस्त्रबंदीच्या मोहिमेत आघाडी घेण्याचा निर्धार पुन्हा एकदा करीत आहे, असे अॅबे म्हणाले.
अणुबॉम्ब हल्ल्याची सत्तरी
By admin | Published: August 09, 2015 10:14 PM