शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

ऑलिम्पिकपूर्वीच रेल्वे नेटवर्कवर हल्ला; फ्रान्समध्ये खळबळ; लाखाे प्रवासी खाेळंबले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 5:38 AM

अनेक रेल्वेमार्गांवर ताेडफाेड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपाेळ करण्यात आली.

पॅरिस : ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात हाेण्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे नेटवर्कवर हल्ला झाला. अनेक रेल्वेमार्गांवर ताेडफाेड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपाेळ करण्यात आली. या घटनांमध्ये अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या दीड ते दाेन तास विलंबाने धावत हाेत्या. याचा सुमारे आठ लाख लाेकांना फटका बसला आहे. हल्ला काेणी आणि का केला, याबाबत माहिती समाेर आलेली नाही.फ्रान्समध्ये पॅरिस येथे यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे  २६ जुलै राेजी उद्घाटन झाले. त्यापूर्वीच स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजताच्या सुमारास हल्ला झाला. यामुळे शेजारी देश बेल्जियम तसेच इंग्लिश खाडीमार्गे लंडनला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरही परिणाम झाला.

न्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील रेल्वेमार्ग या हल्ल्यामुळे प्रभावित झाले. फ्रान्सच्या नॅशनल रेल्वे कंपनीने सांगितले की, हायस्पीड रेल्वेमार्गावर काही ठिकाणी संशयास्पद कारवाया झाल्या आहेत. 

रेल्वे रुळांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांच्या बाजूला समांतर असलेल्या केबल्सचेही नुकसान करण्यात आले आहे. यामुळे रेल्वेसेवा सुरू करण्यात प्रचंड अडचणी निर्माण हाेतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुमारे आठ लाख प्रवाशांना या हल्ल्याचा फटका बसला आहे.  हल्लेखाेरांनी रेल्वेच्या केबल्सची जाळपाेळ केली. अधिकाऱ्यांनी या मार्गांवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकताे.

इस्रायलने दिला हाेता धाेक्याचा इशाराइस्रायलने फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांना गुरुवारी एक पत्र लिहून आपल्या देशाच्या खेळाडूंवर हल्ला हाेण्याची शक्यता असल्याचे म्हटले हाेते. इराण समर्थित दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी माहिती मिळाल्याचे इस्रायलने पत्रात म्हटले हाेते.

१९०० या वर्षात पॅरिसमध्येच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर सर्वप्रथम हल्ला झाला हाेता. काही समाजकंटकांनी गर्दीवर बाॅम्ब फेकला हाेता. त्यात अनेक जण जखमी झाले हाेते. १९७२ आणि १९९६ मध्ये असे हल्ले झाले होते.

ब्रिटनने नागरिकांना दिला अलर्टहल्ल्यानंतर ब्रिटनने आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कचा वापर करू नये, असे सांगण्यात आले आहे. युराेस्टार या ब्रिटिश रेल्वे कंपनीनेदेखील अनेक रेल्वे रद्द आणि काहींचे मार्ग बदलले आहेत. दुपारनंतर काही रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४