अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका शाळेवर आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत २७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. काबुलमधील शिया बहुल परिसरात ही घटना घडली.या परिसरात हजारो अल्पसंख्याक नागरिक राहतात.या परिसरात नेहमी हल्ल्याच्या घटना घडतात.
शुक्रवारी या शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती, या परीक्षेची तयारी विद्यार्थी करत होते. अचानक शाळेवर मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात २७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमेरिकेने पाब्लो एस्कोबारएवढ्याच खतरनाक अफगानी ड्रग माफियाला सोडले; भारत टेन्शनमध्ये
अफगाणिस्तान गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नाफी ताकोर यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. 'हल्ला झाला त्या ठिकाणी बचाव पथक पोहोचले आहे, अफगाणिस्तानमध्ये मागील वर्षी तालिबानची सत्ता आली आहे.त्यामुळे येथील हिंसाचाराला काही दिवसापासून ब्रेक लागला होता. पण आता काही महिन्यांपासून पुन्हा हिंसाचार वाढला आहे.
अफगाणिस्तानमध्ये शिया हजारा या लोकांवर गेल्या अनेक वर्षापासून अत्याचार होत आहे. तालिबानींची अफगाणिस्तानवर १९९६ ते २००१ पर्यंत सत्ता होती, यावेळीही त्यांच्यावर या समुहावर अत्याचार केल्याचे आरोप होते. पुन्हा एकदा सत्ते आल्यानंतर अत्याचाराचे आरोप सुरू आहेत.
हल्ला होण्याअगोदरचा त्या शाळेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अफगाणिस्तानमधील एका पत्रकाराने शेअर केला आहे, या व्हिडीओत शाळेत मोठ्या संख्यने विद्यार्थी उपस्थिती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.