ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि, 6 - लंडनमध्ये शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्याची घटना ताजी असतानाच आज पॅरिसमध्येही पुन्हा हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. पॅरिसमधील नॉट्रे डेम कॅथेड्रलबाहेर एका अधिकाऱ्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. दरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक हल्लेखोर जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती पॅरिस येथील पोलीस मुख्यालयाने दिली आहे.
हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाला आहे. मात्र या हल्ल्याचा नेमका उद्देश अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, ही कारवाई आता संपली असून, या प्रकारामुळे या भागात काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या प्रकणी दहशतवाद विरोधी यंत्रणेकडून या हल्ल्याची चौकशी सुरू झाली आहे.
Police shoot, injure attacker outside Paris"s Notre-Dame cathedral, reports AFP quoting authorities— ANI (@ANI_news) June 6, 2017
#UPDATE Paris police say operation at Notre Dame cathedral is over; one attacker wounded, reports AP— ANI (@ANI_news) June 6, 2017