किन्शासा : कोंगो या देशाची राजधानी किन्शासा येथे असलेला तुरुंग फोडून कैद्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी १२९ जणांचा मृत्यू व ५९ जण जखमी झाले. यावेळी झालेल्या गाेळीबार आणि चेंगराचेंगरीत सापडून बहुतांश कैद्यांचा मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
त्या देशात मकाला येथे असलेल्या तुरुंगातून पलायन करणाऱ्या कैद्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जुमानत नाहीत असे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २९ जण ठार झाले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सापडून अन्य कैद्यांचा मृत्यू झाल. तुरुंगातील काही कैद्यांनी महिलांवर बलात्कार केल्याचेही प्रकार घडले आहेत. कैद्यांनी केलेल्या जाळपोळीत तुरुंगाचे नुकसान झाले. (वृत्तसंस्था)
क्षमता १,५००ची, डांबले १२ हजार कैदीमकाला येथील तुरुंगात १५०० कैदी ठेवण्याची सुविधा असली तरी तिथे १२ हजारांहून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश कैद्यांवरील खटल्यांचे कामकाजच अद्याप सुरू झालेले नाही असे ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालामध्ये म्हटले आहे. याआधीही २०१७ मध्ये एका धार्मिक गटाने हा तुरुंग फोडून काही कैद्यांची सुटका केली होती.