जेरूसलेम/गाझा : पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्याच्या उद्देशाने इजिप्तने सुचविलेला युद्धबंदीचा प्रस्ताव हमासने नाकारल्यानंतर इस्रायलने मंगळवारी गाझापट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. गाझावर नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत १९२ पॅलेस्टिनी ठार झाले असून हमासनेही इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरूच ठेवले आहेत. इजिप्तने युद्धबंदीचा प्रस्ताव सुचविल्यानंतर इस्रायलने तो मान्य करत सकाळी नऊ वाजेपासून हल्ले थांबविले होते; मात्र हमासने हा प्रस्ताव धुडकावून लावत रॉकेट हल्ले सुरूच ठेवले. हमासने युद्धबंदी मान्य करण्यास नकार दिल्यास आपण हल्ले तीव्र करणार असल्याचा इशारा इस्रायलने दिला असतानाही हमासने हे हल्ले सुरूच ठेवले. सकाळपासून असे ४७ रॉकेट हल्ले झाले. हमास हल्ले करत असल्यामुळे आम्हाला हमासविरुद्ध मोहीम पुन्हा सुरू करावी लागली, असे इस्रायली लष्कराने टष्ट्वीटरवर जारी एका निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
युद्धबंदीचे प्रयत्न निष्फळ, इस्रायलचे हल्ले पुन्हा सुरू
By admin | Published: July 16, 2014 2:16 AM