न्या पी डॉव, दि. 19- राखिन प्रांतात ५ सप्टेंबरपासून कोणतीही जाळपोळ, हिंसा किंवा लष्करी कारवाई झालेली नाही, तरीही बांगलादेशाच्या दिशेने स्थलांतर का होत आहे ते माहिती नाही, असं धक्कादायक विधान म्यानमारच्या स्टेट काऊंसिलर अाँग सान सू की यांनी केलं आहे. म्यानमारची राजधानी न्या पी डॉव येथे राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेवर आयोजीत सभेत त्यांनी आज भाषण केलं व प्रथनच रोहिंग्यांच्या प्रश्नावर खुलेपणाने मतं व्यक्त केली.
सू की भाषणात म्हणाल्या, राखिन प्रांतात शांततेसाठी आमते सरकार आधीपासून प्रयत्न करत आहे. २०१७-२२ अशी राखिनसाठी पंचवार्षिक योजनाही आम्ही केली आहे. त्यामिळे येथे रोजगार उपलब्ध होईल, शिक्षण आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत. तसेत जेथे फक्क बोटीने जाता येत असे अशा प्रदेशातही रस्ते, वीज व पायाभूत सुविधांची सोय माझ्या सरकारने केल्या आहेत. राखिन प्रांतामध्ये नवे रेडिओ स्टेशन सुरु होणार असून त्यात बंगाली, राखिन व म्यानमारी भाषेत आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं जाईल.
रोहिंग्यांच्या देशाबाहेर जाण्याबाबत त्या म्हणाल्या, रोहिंग्यांनी बांगलादेशात जाण्याचे काहीच कारण नाही, ५ सप्टेंबर नंतर कोणतीही हिंसा किंवा लष्करी कारवाई राखिनमध्ये झालेली नाही. तसेच ५०% मुस्लीम गावे आजही तशीच व्यवस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या स्थलांतरामागची कारणे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बांगलादेशाशी संबंध सुधारण्याचे आमचे सरकार प्रयत्न करत आहे,
बांगलादेशाचे गृहमंत्रीही लवकरच म्यानमारला भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेत्यांनी राखिनबाबत चिंता व्यक्त केली आहे. आम्हालाही अल्पसंख्यांक व आमच्या नागरिकांची काळजी आहे. आरोप प्रत्यारोपाच्या सत्रापेक्षा योग्य पुराव्यानिशी माहिती समोर आली तर कारवाई करणे सोपे जाईल. पुरावे असले तर आमचे सरकार धर्म, वंश यांचा विचार न करता कारवाई करेल. आमच्या सरकारने गेल्या वर्षापासून शांतता, शाश्वत विकासासाठीच प्रयत्न केला आहे. कोफी अन्नान यांच्या अहवालातील काही सूचनांवर आम्ही अंमलबजावणी केली आहे तर काही सूचना अंमलात यायला थोडा काळ जाईल असेही सू की म्हणाल्या.
१९९३ च्या नियमांनुसार स्वीकार होणारजे म्यानमारमधून रेफ्युजी म्हणून बाहेर गेले आहेत त्यांना परत घेण्याची प्रक्रीया आम्ही १९९३ साली ठरवलेल्या नियमांनुसारच करु अशी मोठी घोषणा सू ची यांनी केली. परत येण्यास इच्छुक असणार्यांची १९९३ च्या नियमांनुसार पडताळणी होईल.