शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:31 IST

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने एक सुरक्ष भागीदारी केली आहे. या योजअंतर्गत तीन देश संयुक्तपणे ऑस्ट्रेलियामध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या तयार करणार आहेत. या भागीदारीनंतर चीन अत्यंत भडकला आहे. काही देशांनी 'शीतयुद्धाची मानसिकता' ठेऊन काम करणे बंद करावे, असे चीनच्या वॉशिंग्टन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. (Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious)

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यांसंदर्भात घोषणा केली आहे. या प्रोजेक्टला Aukus असे नाव देण्यात आले आहे. मॉरिसन म्हणाले, तीन देशांचे संघ येत्या दीड वर्षात एक संयुक्त योजना तयार करतील. या योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियाची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी असेंबल केले जाईल. अणुभट्टीवर चालणाऱ्या पाणबुड्या असणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील सातवा देश असेल.

पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. खरे तर, NPT अण्वस्त्रे नसलेल्या देशांना आण्विक-शस्त्रास्त्रांवर चालणाऱ्या पाणबुड्या बांधण्याची परवानगी देते. मात्र, यामुळे कोणत्याही देशाची अण्वस्त्रे बनविण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते.

एनपीटीचेच पालन करणार -ऑस्ट्रेलिया -एनपीटीच्या या पळवाटाचा फायदा घेत ऑस्ट्रेलिया अण्वस्त्रे बनवू शकतो आणि आपली लष्करी क्षमता वाढवू शकतो. मात्र, अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही, आम्ही आण्विक अप्रसार कराराचेच (एनपीटी) पालन करू, असे ऑस्ट्रेलियन प्रशासनाने वारंवार म्हटले आहे. मात्र, काही अहवालांनुसार, अमेरिका आणि इंग्लंडच्या साथीने ऑस्ट्रेलियन सरकारने उचललेले हे पाऊल अण्वस्त्रांच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्याचे काम करू शकते.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाAmericaअमेरिकाUSअमेरिकाEnglandइंग्लंडBoris Johnsonबोरिस जॉन्सनJoe Bidenज्यो बायडन